मुझफ्फरनगर : सर्जिकल स्ट्राईकचं भाजपकडून राजकारण सुरु आहे आणि त्याचं श्रेय निवडणुकीत घ्यायचा भाजप प्रयत्न करत आहे, अशी टीका काँग्रेसकडून होत आहे. पण या सर्जिकल स्ट्राईकचं श्रेय घेण्याचा केविलवाणा प्रयत्न समाजवादी पक्षाकडून होताना दिसतोय.


मुलायमसिंग यादव यांनी सल्ला दिल्यानंतर भारत सरकारनं सर्जिकल स्ट्राईक केला, त्यामुळे मुलायमसिंग यांचं अभिनंदन असा पोस्टर मुझफ्फरनगरमध्ये समाजवादी पक्षाकडून लावण्यात आला आहे. या पोस्टरमध्ये मुलायमसिंग यादव, अखिलेश यादव आणि समाजवादी पक्षाचे जिल्हाध्यक्ष शमशेर मलिक यांचे फोटो लावण्यात आले आहेत.