लखनऊ : समाजवादी पक्ष आणि काँग्रेस यांच्यात उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी युती झाली आहे. आज लखनऊमध्ये त्याची औपचारिक घोषणा करण्यात आली. 403 विधानसभा जागांपैकी समाजवादी पक्ष 298 आणि काँग्रेस 105 जागा लढवणार आहे.


समाजवादी पक्षाचे नेते नरेश उत्तम आणि यूपी काँग्रेसचे अध्यक्ष राज बब्बर यांनी लखनऊमध्ये पत्रकार परिषद घेऊन याची घोषणा केली. त्यांनी म्हटलं की, सांप्रदायिक शक्तींच्या विरोधात समाजवादी पक्ष आणि काँग्रेस एकत्र निवडणूक लढवणार आहे.