नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय आहे ? त्याचं बिल कोण भरतं ? पंतप्रधान कोणता मोबाईल वापरतात ? मोदींचा मोबाईल नंबर काय आहे ? यासारखे अनेक प्रश्न पंतप्रधान कार्यालयाला विचारण्यात येत आहेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मोदी पंतप्रधान होण्यापूर्वी रामलिलामध्ये काम करायचे का ? त्यामध्ये त्यांची भूमिका काय होती ? मोदी यांना किती टक्के मार्क मिळाले ? यासारख्या प्रश्नांचाही यात समावेश आहे. 


पंतप्रधान कार्यालयाला विचारण्यात आलेले प्रश्न आणि पंतप्रधान कार्यालयानं दिलेली उत्तर


मोदींच्या इंटरनेटचा स्पीड काय आहे ? त्याचं बिल कोण भरतं ?


उत्तर: मोदी वापरत असलेल्या इंटरनेटचा स्पीड 34 एमबीपीएस आहे, त्याचं बील पंतप्रधान कार्यालय भरतं


मोदींना खाण्यात काय आवडतं ?
उत्तर: मोदींना गुजराती जेवण आवडतं. त्यांचे आचारी बद्रीलाल मीणा यांनी केलेली बाजरीची भाकरी आणि खिचडीही त्यांना आवडते. 


माहिती अधिकाऱ्याच्या अंतर्गत पंतप्रधान कार्यालयात 2015 या वर्षामध्ये जवळपास 13 हजार अर्ज प्राप्त झाले आहेत. सुरक्षेबाबतचे अनेक प्रश्नही या अर्जांमध्ये विचारण्यात आले आहेत. पण त्याची उत्तरं पंतप्रधान कार्यालयानं दिली नाहीत.