पणजी : गोव्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे बंडखोर नेते सुभाष वेलिंगकर यांनी नव्या पक्षाची घोषणा केली आहे.


गोवा सुरक्षा मंच या नव्या राजकीय पक्षाची वेलिंगकर यांनी स्थापना केलीय. गोव्यात पत्रकार परिषद घेऊन वेलिंगकरांनी आपल्या नव्या पक्षाची घोषणा केलीय.. आगामी गोवा निवडणुका वेलिंगकर पूर्ण ताकदीनिशी लढवणार असून त्यांनी भाजप सरकारला सत्तेतून खाली खेचण्याचे आव्हान दिलंय. या निवडणुकीत मातृभाषा अस्मिता या मुद्द्यावर शिवसनेशी युती करण्याचा निर्णय घेतल्याचे वेलिंगकर यांनी स्पष्ट केलंय. शिवसेनेनेही वेलिंगकर यांच्या पक्षाशी युती करण्यास सहमती दर्शवलीय..