आग्रा : दाक्षिणात्या चित्रपटांचा सुपरस्टार रजनीकांत यांच्या राजकारणात प्रवेशाची सध्या जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अशातच, भाजप रजनीला आपल्याकडे खेचण्याचा पुरेपूर प्रयत्न करत असल्याच्या बातम्याही जोरात आहेत. परंतु, पक्षाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी मात्र या केवळ अफवा असल्याचं म्हटलंय. इतकंच नाही तर त्यांनी जे वक्तव्य केलंय त्यामुळे रजनी भाजपकडे पाठ फिरवण्याचीही शक्यता जास्त आहे.


स्वामी यांनी रजनीकांत यांना अडाणी आणि महामूर्ख म्हटलंय. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. 


'रजनीकांत महामूर्ख आहे... अडाणी आहे.... भारत आणि पाकिस्तानाचं संविधान समोर ठेवाल तर त्याला कोणतं संविधान कोणत्या देशाचं आहे हे ओळखता येणार नाही' असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलंय.