नवी दिल्ली : सिंहस्थ कुंभमेळ्यात एक भावनिक दृश्य पाहायला मिळाले. उज्जैनमध्ये २२ एप्रिलपासून कुंभमेळा सुरु झालाय. तो २१ मे पर्यंत चालणार आहे. यासाठी हजारो पोलीस तैनात करण्यात आले आहे. अनेक पोलीस दिवस-रात्र काम करत आहेत. यावेळी एक हृदय हेलावणारी घटना पाहायला मिळाली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

वृद्ध महिलेला चक्क उचलून एका पोलिसांने रेल्वे ब्रिज पार केला. याचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. वृद्ध महिला कुंभमेळाव्याला आली होती. तिला पुल पार करणे शक्य नव्हते. तिने पोलिसाकडे मदत मागितली. पोलिसांने तिला मदत करताना चक्क उचलून घेतले आणि तिला इस्थित स्थळी पोहोचविण्यास मदत केली. हाय व्हिडीओ फेसबुकवर व्हायरल होत आहे.