नवी दिल्ली : नीटबाबत राज्याला दिलासा मिळण्याची शक्यता आहे. सुप्रीम कोर्टानं सुनावणी दरम्यान सीईटीबाबत सकारात्मक मत नोंदवलंय. राज्यांच्या सीईटी देणा-या विद्यार्थ्यांना नीटमधून वगळलं जाईल असं मत, सुप्रीम कोर्टानं सुनावणीवेळी नोंदवलं आहे. त्यामुळे राज्याची सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.


सीईटी दिलेल्या विद्यार्थ्यांची संख्या तब्बल चार लाख नऊ हजार एवढी आहे. मात्र खासगी संस्था आणि अभिमत विद्यापीठांची सीईटी देणा-यांना यातून दिलासा मिळण्याची शक्यता नाही. आता नीटवरची पुढील सुनावणी सोमवारी होणार आहे.