किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर सुप्रिया संतापल्या
पवार कन्या सु्प्रिया सुळे या पहिल्यांदा संतापल्या आहेत.
नवी दिल्ली : पवार कन्या सु्प्रिया सुळे या पहिल्यांदा संतापल्या आहेत, सुप्रिया सुळे सोमय्यांच्या वक्तव्याचा संदर्भ देऊन म्हणाल्या, 'आम्हा सगळ्यांना तुरुंगात डांबले तरी आम्ही घाबरणाऱ्यांपैकी नाहीत. आम्ही मराठे आहोत; कधीच डगमगत नाही'.
सोमय्या शुल्लक
'सोमय्यासारखी शुल्लक व्यक्ती टीका करीत सुटते आणि प्रसारमाध्यमे त्यांना उचलून धरतात. टीका करणारी व्यक्तीही भारदस्त असावी. प्रसारमाध्यमांशी आम्ही सुसंवाद ठेवतो, याचा अर्थ त्यांनी आम्हाला 'पप्पू' समजू नये. महाराष्ट्रातील जनतेला राष्ट्रवादी काँग्रेसबाबत प्रचंड आदर आहे', असंही सुप्रिया सुळे यावेळी म्हणाल्या.
आमचा आवाज कुणीही दाबू शकत नाही
'सगळ्यांना तुरुंगात डांबले तरी आम्ही घाबरणारे नाहीत, मराठे आहोत! डगमगत नाही, शांत बसणार नाही आमचा आवाजही कोणी दाबू शकणार नाही. छगन भुजबळ यांच्या हातून चूक झाली किंवा नाही हे नंतर स्पष्ट होईल, परंतु संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस भुजबळ समीर यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी आहे', अशी प्रतिक्रियाही यावेळी सुप्रिया सुळे यांनी दिली.