जम्मू : जम्मूच्या आर एस पुरा, अर्णिया, अखनूर सेक्टरमध्ये काल रात्रभर पाकिस्तानच्या बाजूनं पुन्हा एकदा अकारण गोळीबार करून शस्त्रसंधीचं उल्लंघन करण्यात आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या गोळीबारात बीएसएफचे हेड कॉन्सेटेबल सुशील कुमार शहीद झाले आहेत. आरएस पुरा सेक्टरमधल्या गावांमध्ये या गोळीबारांनंतर भीतीचं वातावरण आहे. 


पाकिस्तानच्या या गोळीबाराला भारतीय सैन्याने चोख प्रत्युत्तर दिलंय. याआधी पाकिस्तानकडून झालेल्या गोळीबारात जवान गुरमित सिंग शहीद झाले होते.