नवी दिल्ली :  कॅनडामध्ये अॅमझॉन साईटवर भारताचा राष्ट्रीय ध्वज असलेल्या डोअर मॅटवर सुषमा स्वराज यांनी तीव्र शब्दांत नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणात अॅमेझॉनने बिनाशर्त माफी मागावी, तसेच राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करणारे सर्व प्रॉडक्ट तात्काळ परत मागावा असा इशारा दिला आहे. असे तात्काळ नाही केले तर अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना यापुढे भारताचा व्हिसा मिळणार नाही असाही कडक शब्दात इशारा दिला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

 



यापूर्वी एका व्यक्तीने ट्विटरवर सुषमा स्वराज याचे लक्ष याकडे वेधले होते. अॅमेझॉन कॅनडावर तिरंगा छापलेले डोअर मॅट विकले जात आहेत. यावर सुषमा स्वराज यांनी त्वरित प्रतिक्रिया देत ट्विट केले केली, अॅमेझॉनने बिनाशर्त माफी मागावी, तसेच राष्ट्रीय ध्वजाचा अपमान करणारे सर्व प्रॉडक्ट तात्काळ परत मागावा. 


 



यानंतर परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी आणखी एक ट्विट केले त्यात इशारा दिला की, जर तात्काळ माफी मागितली नाही आणि सर्व प्रोडक्ट काढण्यात आले नाही तर यापुढे अॅमेझॉनच्या अधिकाऱ्यांना यानंतर व्हिसा देण्यात येणार नाही. आम्ही यापूर्वी जारी केलेले व्हिसाही रद्द करू असेही यात नमूद केले. 




परराष्ट्र मंत्रींनी कॅनडाच्या भारतीय उच्चायुक्तालयाला या प्रकरणात अॅमेझॉन विरोधा सक्षम पाऊले उचलण्याचे आदेश दिले आहेत.