नवी दिल्ली : द्वारका-शारदा पीठाचे शंकराचार्य स्वामी स्वरुपानंद सरस्वती पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यांमुळे वादात अडकलेत. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हिंदुस्तान टाईम्सनं दिलेल्या बातमीनुसार, शंकराचार्य यांनी २००३ साली केदारनाथमध्ये आलेल्या जलप्रलयासाठी 'हनिमून कपल्स'ला जबाबदार ठरवलंय.


पवित्र स्थानांवर 'अपवित्र' कृती रोखायला हव्यात असं शंकराचार्यांनी म्हटलंय. पवित्र हिंदू स्थानांवर 'पर्यावरण प्रदूषण'ची प्रवृत्ती अनेक विघ्न समोर उभे करू शकते. देशातील विविध धार्मिक स्थळांवर लोक मौजमजा करण्यासाठी आणि पिकनीकसाठी जातात. हनीमूनसाठी लोक पवित्र अशा देवभूमी उत्तराखंडची निवड करतात, केदारनाथचा जलप्रलय यामुळेच तर झाला होता. यांना ताबडतोब आळा घातला गेला नाही तर असेच प्रसंग पुढेदेखील होत राहणार, असंही शंकराचार्य म्हणतायत.


उल्लेखनीय म्हणजे, या जलप्रलयात जवळपास पाच हजारांहून अधिक जणांना आपले प्राण गमवावे लागले होते.