ताजमहलवर अजून एक संकट
यमुना नदीतील घाणीतल्या कीड्यांमुळे ताजमहलवर हिरवा थर साचू लागलेला मात्र आता प्रदुषणामुळे ताजमहल तपकिरी दिसू लागलाय. ताजमहलच्या स्तंभांवर धूळ, कार्बन आणि बायेमासचा थर साचलाय. उत्तरेकडील स्तंभ पांढरे आहेत तर दुसरीकडे काही स्तंभ काळे पडलेले आहेत.
मुंबई : यमुना नदीतील घाणीतल्या कीड्यांमुळे ताजमहलवर हिरवा थर साचू लागलेला मात्र आता प्रदुषणामुळे ताजमहल तपकिरी दिसू लागलाय. ताजमहलच्या स्तंभांवर धूळ, कार्बन आणि बायेमासचा थर साचलाय. उत्तरेकडील स्तंभ पांढरे आहेत तर दुसरीकडे काही स्तंभ काळे पडलेले आहेत.
ASI (भारतीय पुरातत्त्व सर्वेक्षण) ने धुळीचा एक सॅम्पल चाचणी करिता पाठविला आहे. तर दुसरीकडे उत्तर प्रदेश प्रदूषण नियंत्रण बोर्डच्या अभ्यासात सगळ्यात जास्त वायू प्रदूषण हे आग्रा येथेच आहे अशी माहिती समोर आली आहे. जे गाझियाबाद, नोएडा, कानपुर या औद्योगिक शहरांपेक्षाही जास्त आहे.
ताजमहलवर कार्बनचे कण साचल्यापासून आईआईटी आणि एटलांटा यूनिव्हर्सिटीच्या रिपोर्टनंतर संसदीय कमिटीच्या शिफारशीनुसार ASI ने ताजमहल वर मडपॅक सुरू केला.
उत्तर पूर्व बाजूच्या स्तंभावर मडपॅक केल्यानंतर त्याचे तेज वाढले आणि तपकिरी बाजू पांढरी दिसू लागलीये. बाकीच्या स्तंभांवर प्रदुषणाचा परिणाम मात्र अजूनही तसाच आहे. ताजमहल पहायला आलेले पर्यटक पांढऱ्या आणि पिवळ्या पडलेल्या स्तंभांचा फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करत आहेत.