हैदराबाद :  ट्रिपल तलाकचे आणखी एक विचित्र प्रकरण हैदराबादमध्ये समोर आले आहे.  एएनआय वृत्तसंस्था आणि इंडिया टुडे यांनी दिलेल्या वृत्तानुसार पीडित महिलेला व्हॉट्सअॅपवरून तलाक देण्यात आला. तसेच सासऱ्यासोबत सेक्स करण्यास सासू दबाव टाकत होती, अशी धक्कादायक माहिती पीडितीने दिली आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पीडित महिलेने व्हॉटसअपवर तलाक मिळाल्यानंतर तक्रार दाखल केली त्यावेळी तीने आपल्या सासऱ्यांचा वासनांधचा बुरखा फाडला. लग्न झाल्यावर आपली सासू सासऱ्याशी शरीर संबंध ठेवण्यास सांगत होती. तसेच याला पतीही विरोध करत नव्हता. या सर्व प्रकाराला मी विरोध केला तेव्हा माला त्यांनी सहा दिवस एका खोलीत बंद करून ठेवले.  त्यानंतर माझे वडील आले आणि त्यांनी मला या जाचातून सोडवले. 


महिलेला घरात मोलकरणीसारखी वागणूक मिळत होती. तिला खायलाही देण्यात येत नव्हते. तसेच तिची सासू काळी जादू करत असल्याचाही आरोप पीडीत महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे