आयकर विभागाकडून 49 हजार कोटींचा काळा पैसा उघड
गेल्या चार वर्षात आयकर विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे 49 हजार कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आलीय. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिलीय.
नवी दिल्ली : गेल्या चार वर्षात आयकर विभागाने केलेल्या कारवाईत सुमारे 49 हजार कोटींची काळी संपत्ती उघड करण्यात आलीय. अर्थ राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी लोकसभेत ही माहिती दिलीय.
आयकर विभागाने 2013-14 आणि 2015-16 या वर्षात दोन हजार 534 जणांवर कारवाई केलीय. यांत सुमारे 45 हजार कोटींच्या उत्पन्नासह जवळपास साडेतीन हजार कोटींची बेकायदेशीर संपत्ती जप्त करण्यात आलीय.
टॅक्सचोरी रोखण्यासाठी सरकारकडून कठोर पाऊलं उचलण्यात येत आहेत. या अंतर्गत तब्बल दोन हजार 432 प्रकरणांमध्ये गुन्हे नोंदवण्यात आले असून 116 जणांना दोषी ठरवण्यात आलंय.
आपली अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी सरकारने 31 मार्चपर्यंत दुसरी संधी दिलीय. त्यानंतरही बेकायदेशीर संपत्तीबाबत माहिती समोर आल्यास सरकारने कठोर कारवाईचे संकेत दिलेत.