नवी दिल्ली : रेल्वेने तुम्ही रात्रीचा प्रवास करत असाल आणि तुम्ही झोपले तर काही हरकत नाही. टीसी तुम्हाला तिकीट पाहण्यासाठी उठवू शकणार नाही. कारण रेल्वेच्या नव्या नियमानुसार रात्रीचे तिकीट तपासणी टीसीला करता येणार नाही.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

तिकीट तपासणीसाठी टीसी तिकीट तपासण्यासाठी येईल, या चिंतेने प्रवाशांना तिष्ठत बसावे लागत असे. याशिवाय, अनेकदा टीसी तिकीट तपासण्यासाठी प्रवाशांची झोपमोडही करत असतात. मात्र, आता एक्स्प्रेस गाड्यांच्या स्लीपर आणि एसी श्रेणीच्या डब्यांमध्ये नव्या व्यवस्थेची अंमलबजावणी केली जाणार आहे. प्रवाशांकडून सातत्याने करण्यात आलेल्या तक्रारींमुळे २७ जानेवारीला रेल्वे प्रशासनाकडून हा आदेश काढण्यात आला.


या नव्या आदेशानुसार आता रात्रीच्यावेळी तिकीट तपासण्याची वेळ निश्चित करण्यात आली आहे. त्यानंतर रात्री १० ते सकाळी सहा या वेळेत आरक्षित डब्यांमध्ये तिकीट तपासणी होणार नाही. मात्र, वेळ पडल्यास रेल्वे पोलीस आरक्षित डब्यातील प्रवाशांच्या सामानाची तपासणी करु शकतात. त्याचे अधिकार कायम ठेवण्यात आले आहेत.


दरम्यान, तिकीट न तपासण्याचा नियम यापूर्वीच २०१० मध्ये लागू करण्यात आला होता. मात्र, या आदेशाचे पालन होत नव्हते. मात्र, आता केवळ रात्रीच्यावेळी डब्यांमध्ये चढणाऱ्या प्रवाशांचेच तिकीट तपासण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.