पणजी: माझ्या सावत्र आईनं मला आमदाराला 50 लाखांना विकलं अशी धक्कादायक कबुली गोव्यामध्ये बलात्कार झालेल्या पीडित मुलीनं केली आहे. या प्रकरणी गोव्याचे आमदार बाबुश उर्फ अठानाशिओ मोन्सेरात यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

16 वर्षांच्या नेपाळी मुलीनं हे गंभीर आरोप केले आहेत. तसंच आपल्यावर वारंवार बलात्कार केल्याचंही या पीडित मुलीनं बालकल्याण समितीपुढे झालेल्या जबानीमध्ये सांगितलं आहे. मोन्सोरात यांनी पक्षविरोधी कारवाया केल्यामुळे मागच्याच वर्षी त्यांची काँग्रेस पक्षातून हकालपट्टी झाली होती.  


याप्रकरणी मोन्सेरात यांना समन्स बजावल्यानंतर ते पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाले होते. आपल्यावर होत असलेले आरोप हे खोटे आहेत, आपल्याला अडकवण्यासाठी हे सगळं सुरु असल्याची प्रतिक्रिया मोन्सोरात यांनी दिली आहे.