भोपाळ : मध्य प्रदेशात भोपाळ-उज्जैन पॅसेंजर ट्रेनमध्ये झालेला स्फोट हा दहशतवादी हल्ला असल्याचे मध्य प्रदेशचे पोलीस महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था) मकरंद देवासकर यांनी सांगितले. या प्रकरणी तिघांना अटक करण्यात आली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकल ट्रेनमध्ये झालेल्या स्फोटात नऊ पेक्षा जास्त प्रवासी जखमी झाले होते. स्फोटाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट नाही. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. एएनआय या वृत्तसंस्थेच्या वृत्तानुसार मध्यप्रदेशमधील शाजापूरमध्ये भोपाळवरुन उज्जैनला जाणा-या पॅसेंजर ट्रेनमध्ये मंगळवारी सकाळी दहाच्या सुमारास स्फोट झाला होता.



ट्रेनच्या डब्यात गनपावडर सापडली असून त्यादिशेनेही तपास सुरु आहे, अशी माहिती मध्य प्रदेशमधील गृहमंत्र्यांनी  दिली आहे.