श्रीनगर : जम्मूतील पंपोर इथंल्या सीआरपीएफच्या तुकडीवर दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यात कॅप्टनसह दोन सीआरपीएफचे जवान शहीद झाले असून नऊ जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये एका नागरिकाचाही समावेश आहे. शनिवारी सायंकाळपासून सुरु असलेली चकमक अद्यापही सुरु आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

शनिवारी संध्याकाळी दहशतवाद्यांनी जम्मू-श्रीनगर हायवेवर सीआरपीएफच्या बसवर हल्ला केला होता. त्यानंतर ही चकमक सुरु झालीये. अकरा सीआरपीएफचे जवान या बसमध्ये होते. हे सर्व जखमी झालेत. 


बसवर हल्ला केल्यानंतर हे तीन दहशतवादी एका इमारतीमध्ये घुसले होते. या इमारतीत जवळपास दोनशे नागरिक होते. त्यांना सुरक्षित बाहेर काढण्यात यश आलय. कालपासून या इमारतीला घेरण्यात आलंय. 


रात्री अंधाराचा फायदा घेऊन हे अतिरेकी पळूनये यासाठी इमारतीच्या बाजूला लाईट्स लावण्यात आल्यात. अजूनही या इमारतीमध्ये सर्च ऑपरेशनस सुरु असून आजूबाजूच्या परिसरात सैन्याचं कोंबिंग ऑपरेशन सुरु आहे..