कॅश वॅनवर दहशतवाद्यांचा हल्ला, ५ पोलीस शहीद
जम्मू-कश्मीरमधील गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँकेच्या कॅश वॅनवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये ५ पोलीस शहीद झाले आहेत. बँकेच्या २ कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे.
श्रीनगर : जम्मू-कश्मीरमधील गुलगाममध्ये दहशतवाद्यांनी एका बँकेच्या कॅश वॅनवर हल्ला केला. दहशतवाद्यांनी केलेल्या या हल्ल्यामध्ये ५ पोलीस शहीद झाले आहेत. बँकेच्या २ कर्मचाऱ्यांचा देखील यामध्ये मृत्यू झाला आहे.
हल्ल्यानंतर दहशतवाद्यांनी पोलिसांच्या रायफल देखील पळवल्या. सध्या संपूर्ण भागात सर्च ऑपरेशन सुरु आहे. दहशतवाद्यांना पकडण्यासाठी संपूर्ण भागाला वेढा घालण्यात आला आहे.