कोलकाता : पश्चिम बंगाल विधानसभेच्या ५३ जागांसाठी पाचव्या टप्प्याच्या मतदानाला सकाळी सात वाजता सुरूवात झालीय. मुख्यमंत्री ममता बॅनर्जींसह अनेक दिग्गजांचं भवितव्य आजच्या मतदानात निश्चित होणार आहे. 


कडेकोट  बंदोबस्त


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या टप्प्याच्या मतदानात ४३ महिलांसह ३४९ उमेदवार मैदानात आहेतच. एकूण १ कोटी २० लाख मतदार कडकोट सुरक्षा व्यवस्थेत आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.  निवडणूक आयोगानं या टप्प्याच्या मतदानासाठी ९० हजार सुरक्षा रक्षक तैनात केलेत. 


मुख्यमंत्री ममता बॅनर्जीचे भवितव्य


मतदानाच्या काळात सर्व ५३ मतदार संघांमध्ये जमावबंदी लागू करण्यात आलीय.  दक्षिण कोलकात्यातल्या भवानीपूर मतदार संघात मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, काँग्रेसच्या माजी केंद्रीय मंत्री दीपा दासमुंशी आणि नेताजीं सुभाष चंद्र बोस यांचे पणतू चंद्रकुमार बोस भाजपच्या तिकीटावर मैदानात आहे. 


याशिवाय शिक्षण मंत्री पार्थ चॅटर्जी, युवककल्याण मंत्री अरुप विश्वास, ऊर्जा मंत्री मनिष गुप्ता, आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्री जावेद अहमद खान यांचंही भवितव्य आज ठरणार आहे.