महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या ढोंगी बाबाला अटक

उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत महिलांचं लैंगिक शोषण करणा-या ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक केलीय.
लखनऊ : उत्तर प्रदेशच्या बाराबंकीत महिलांचं लैंगिक शोषण करणा-या ढोंगी बाबाला पोलिसांनी अटक केलीय.
पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवून बलात्कार
मध्य प्रदेशच्या सतनामधून रामानंद शंकर तिवारी ऊर्फ परमानंदच्या पोलिसांनी मुसक्या आवळल्यात. बाराबंकीतील देवा क्षेत्र इथल्या हर्रई या ठिकाणी या भोंदूबाबाचा गेल्या २५ वर्षांपासून आश्रम आहे. आश्रमात आलेल्या महिलांना पुत्रप्राप्तीचे आमिष दाखवून पूजा-पाठ करण्याच्या बहाण्यानं तो आश्रमात बोलवायचा. महिला आश्रमात आल्यानंतर तिच्यावर बलात्कार करायचा.
कॉम्प्युटर बिघडल्याने भांडे फुटले
याचा व्हिडीओ बनवून कुणाला काही सांगितल्यास हा व्हिडीओ सार्वजनिक करण्याची धमकी तो द्यायचा. हा बाबा हे अश्लील व्हिडीओ आणि एमएमएस तो बनवायचा आणि कॉम्प्युटरमध्ये सेव्ह करायचा. मात्र कॉम्प्युटर खराब झाल्यानं तो घेऊन इंजीनिअरकडे गेला. त्यावेळी हे व्हिडीओ इंजीनिअरच्या नजरेस पडले आणि तो हादरला.
बाबाविरोधात गुन्हा दाखल
त्यानंतर इंजीनिअरनं हे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केले. हे व्हिडीओ पाहून अनेक महिला समोर आल्या आणि ढोंगी बाबाविरोधात गुन्हा दाखल केला.