नवी दिल्ली : काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी नोटाबंदीवर सभागृहात आपल्याला बोलण्यास दिले जात नसल्याचा आरोप केलाय. माझे भाषण तयार आहे. मात्र मला बोलायला दिले जात नाहीये. मी जर सभागृहात बोललो तर भूकंप येईल, असे राहुल गांधींनी म्हटलेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुसरीकडे भाजप नेत्यांनी राहुल गांधींवर उलट टीका केलीये. जे 60 वर्षांपासून घोटाळ्यांचे केंद्र होते ते भूकंपाच्या गोष्टी करतायत, असे भाजपने राहुल गांधींवर 
टीका करताना म्हटलेय. 


केंद्र सरकारने गेल्या महिन्यात जाहीर केलेल्या नोटाबंदीला काँग्रेसचा कडाडून विरोध आहे. संसदेचे हिवाळी अधिवेशन संपण्यास चार दिवस बाकी आहेत. मात्र अद्याप या मुद्द्यावर शांततेने चर्चा होऊ शकलेली नाही. आज सभागृहातील गदारोळामुळे लोकसभेचे कामकाज 14 डिसेंबरपर्यंत स्थगित कऱण्यात आलेय.