लखनौ: मोदींचा हा निर्णय म्हणजे अघोषित आर्थिक आणीबाणी आहे, असा आरोप  बसपा अध्यक्ष मायावती यांनी केला आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

भाजपनं पुढच्या ३ वर्षांसाठी सर्व पैसा जमा केला आहे. आश्वासनं पूर्ण न केल्यानं त्यावरुन जनतेचं लक्ष हटावं. त्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचंही मायावती यांनी म्हटलं आहे.


'मोदींच्या या निर्णयानं काळाबाजार वाढला आहे. रुग्णालय आणि मेडिकल स्टोरवर लोकांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत आहे,' असंही मायावती म्हणाल्या. मायावती यांनी नोटा बंदीवरुन पंतप्रधान नरेंद्र मोदींवर जोरदार टीका केली आहे.