चारबाग रेल्वे स्टेशन बॉम्बने उडवण्याची धमकी
भारतीय रेल्वे सध्या दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. रेल्वे ट्रॅक आणि ट्रेन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवण्याची धमकी देखील मिळत आहे. यूपीची राजधानी लखनऊमधील चारबाग रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा एक फोन आला होता ज्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराहट पसरली.
लखनऊ : भारतीय रेल्वे सध्या दहशतवाद्यांच्या निशान्यावर आहे. रेल्वे ट्रॅक आणि ट्रेन अपघातांच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. रेल्वे स्टेशनला बॉम्बने उडवण्याची धमकी देखील मिळत आहे. यूपीची राजधानी लखनऊमधील चारबाग रेल्वे स्टेशन उडवण्याची धमकी मिळाली आहे. धमकीचा एक फोन आला होता ज्यानंतर रेल्वे अधिकाऱ्यांमध्ये घबराहट पसरली.
बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाल्यानंतर जीआरपीने स्टेशनवर शोध मोहीम सुरु केली. रेल्वे स्टेशन परिसरात प्लॅटफार्म, पार्किंगची कसून पाहणी करण्यात आली. प्रवाशांच्या सामानाची देखील चेकिंग करण्यात आली. दोन तास चाललेल्या या शोध मोहिमेत काहीही हाती नाहबी लागलं. सध्या चौकशी सुरु आहे. ही अफवा असल्याचं सध्या तरी रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात येत आहे.
चारबाग रेल्वे स्टेशनच्या कंट्रोल रूममध्ये बुधवारी सकाळी ९.३० मिनिटांच्या सुमारास हा फोन आला होता. २४ तासात स्टेशन उडवण्याची धमकी देण्यात आली होती. या फोननंतर लगेचच रेल्वेची टीम सक्रीय झाली. सध्या भारतात आयसीस आणि आयएस मोठे घातपात करण्याच्या तयारीत असल्याची शंका व्यक्त होत आहे त्यामुळे रेल्वेला निशाना बनवलं जाऊ शकतं.