हंदवाडा : जम्मू काश्मीरच्या हंदवाडा सेक्टरमध्ये आज पुन्हा एकदा दहशतवादी हल्ल्याचा प्रयत्न लष्कराच्या जवानांनी हाणून पाडला. लष्कराच्या जवानांनी तीन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. या दहशतवाद्यांकडून मोठ्या शस्त्रसाठ्याबरोबरच 2 मोबाईल फोन, 9 ग्रेनेड लॉन्चर, 3 जीपीएस डिव्हाईस, 4 रेडिओ सेट्स, रोकड, ड्रायफ्रुट आणि औषधं जप्त करण्यात आली आहेत.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पहाटेच्या सुमारास 30 राष्ट्रीय रायफलच्या मुख्यालयावर दहशतवाद्यांनी हल्ला केला.  15 मिनिटं दहशतवाद्यांचा गोळीबार सुरू होता. पण प्रत्त्युतरादाखल जवानांनी केलेल्या गोळीबारानंतर दहशतवाद्यांनी धूम ठोकली आहे.


जवानांनी संपूर्ण परिसर घेरला असून कोंबिंग ऑपरेशन आता संपवण्यात आलं आहे. दरम्यान काल संध्याकाळी सहा वाजल्यापासून जम्मू काश्मीरच्या सीमेलगतच्या भागात पाकिस्तानकडून तीन वेगवेगळ्या ठिकांणी तोफांचा हल्ला करण्यात आला आहे.