टोयोटाच्या २९ लाख कार माघारी
जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी टोयोटाने बाजारातून तब्बल २९ लाख गाड्या माघारी बोलावण्याचा निर्णय घेतलाय. एअरबॅगमधील त्रुटींमुळे हा निर्णय़ घेण्यात आलाय.
नवी दिल्ली : जगातील सर्वात मोठी ऑटोमोबाइल कंपनी टोयोटाने बाजारातून तब्बल २९ लाख गाड्या माघारी बोलावण्याचा निर्णय घेतलाय. एअरबॅगमधील त्रुटींमुळे हा निर्णय़ घेण्यात आलाय.
कंपनीच्या अधिकाऱ्यांच्या मते जपानमध्ये विकल्या गेलेल्या ७.५ लाख कार, चीनमधील ६.५ लाख गाड्या, युरोपातील ३.५ लाख गाड्या आणि जगातील इतर ठिकाणी विकलेल्या गेलेल्या ११.६ लाख गाड्यांवर या निर्णयाचा परिणाम होणार आहे.
भारतात टोयोटाने २३ हजार युनिट्स कोरोला एल्टिस सेडान गाड्या माघारी बोलावल्यात.