नवी दिल्ली : जेएनयूचा विद्यार्थी आणि एका महिलेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, या फोटोवर संबंधित महिलेने स्पष्टीकरण दिलेलं आहे. हा फोटो व्हायरल झाला त्यावर सांगण्यात आलं होतं, की जेएनयूचा विद्यार्थी कन्हैय्या आणि प्रोफेसरचं हे काय चाललंय?, कन्हैय्याजवळ सोफ्याच्या हातावर बसलेल्या महिलेचा हा फोटो आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मात्र या महिलेने यावर स्पष्टीकरण दिलं आहे, या महिलेने सांगितलंय की मी प्रोफेसर नाहीय. मी सौम्या मणी त्रिपाठी असून मी एमफीलची विद्यार्थीनी आहे. तसेच हा फोटो मी फेसबुकवर शेअर केला होता. या फोटोखाली तिने लिहिलं होतं, बिहारच्या दोन लोकांनी माझा दिवस द्विगुणित केला, एक कन्हैया आणि दुसरा मनोज वाजपेयी.


यावर आणखी स्पष्टीकरण देताना लिहिलं आहे, असा फोटो काढण्यात मला काहीही वावगं वाटत नाही, ज्या लोकांनी माझ्या आणि माझ्या मित्राचा फोटो अशा प्रकारे पसरवला, त्याच्या मानसिकतेची मला कीव येते.


जो हा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे, तो सौम्याने कन्हैया जेलमधून सुटल्यानंतर काढला होता. सौम्याने 5 मार्च रोजी हा फोटो तिच्या फेसबुक अकाऊंटवर पोस्ट केला होता. 


यावर अनेकांनी हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आणि लिहिलं होतं. ही कन्हैयाची शिक्षिका आहे, हे आहे जेएनयूचं शिक्षण, येथे शिक्षिका विद्यार्थ्यांच्या मांडीवर बसून शिकवते...लाल सलाम? अखेर सौम्या त्रिपाठीने दिलेल्या स्पष्टीकरणानंतर या फोटोमागच्या अफवा आता थांबणार आहेत.