पणजी : गोव्यातून दोन संशयित दहशतवाद्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. सलाफी कर्नाटक या वादग्रस्त संघटनेचे हे दोघं सदस्य असल्याचा संशय आहे. झाकीर नाईक याची ही संघटना आहे. या दोघांकडून सलाफी संघटनेची कागदपत्रं हस्तगत करण्यात आली आहेत.


केंद्रीय गुप्तचर विभाग आणि दहशतवाद विरोधी पथकाकडून दोघांची तपासणी सुरू आहे. अब्दुल नसीर आणि इलियास इस्माईल अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. इलियास हा कर्नाटकचा रहिवासी असून अब्दुल हा गोव्यातलाच आहे.