श्रीनगर : कश्मीरमधील बांदीपुरामध्ये जवानांनी चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. मंगळवारी सकाळपासून दहशतवादी आणि सुरक्षा रक्षकांमध्ये चकमक सुरु होती. त्यामध्ये २ जवानांना ठार करण्यात जवानांना यश आलं आहे.


पाकिस्तानी सीमेतून सतत दहशतवादी घुसखोरीचा प्रयत्न करत आहेत. अनेकदा भारतीय जवानांनी दहशतवाद्यांचा घुसखोरीचा प्रयत्न हाणून पाडला आहे.