लवकरच तुमच्या हातात असेल २ हजारांची नोट
भारतीय नागरिकांना आता आणखी एक मोठी नोट लवकरच पाहायला मिळणार आहे. भारतीय रिजर्व बँकेने याबाबतचे संकेत दिले आहेत.
नवी दिल्ली : भारतीय नागरिकांना आता आणखी एक मोठी नोट लवकरच पाहायला मिळणार आहे. भारतीय रिजर्व बँकेने याबाबतचे संकेत दिले आहेत.
रिजर्व बँक ऑफ इंडिया (RBI)आता दोन हजार रुपयांची नोट आणणार आहे. दूसरीकडे अनेक तज्ज्ञांचं मत आहे की, सरकारने मोठ्या नोटा बंद केल्या पाहिजेत कारण यामुळे काळा पैसा मोठ्या प्रमाणात वाढतो.
म्हैसूरमध्ये छापली जाणार २ हजारांची नोट
सूत्रांच्या माहितीनुसार 2000 रुपयांची नोट ही म्हैसूर करेंसी प्रिंटिंग प्रेसमध्ये छापली जाणार आहे. सरकार आणि बँकेकडून मात्र अजून कोणतीही अधिकृत माहिती दिली गेलेली नाही.
एसएमपीसीआयएल ही मध्य प्रदेशच्या देवास आणि महाराष्ट्रातील नाशिकमधील यूनिट हे देशातील एकूण करंसी नोटेच्या ४० टक्के नोटा छापतात. एसएमपीसीआयएलच्या मुंबई, हैदराबाद, कोलकाता आणि नोएडा यूनिटमध्ये नाण्यांचं उत्पादन होतं.
1938 मध्ये छापली जात होती १० हजाराची नोट
१९३८ मध्ये आरबीआय १०,००० ची नोट देखील छापली जात होती. १९४६ मध्ये त्याची छपाई बंद करण्यात आली. आरबीआयने पुन्हा १९५४ मध्ये १० हजारची नोट छापणे पुन्हा सुरु केलं. १९७८ मध्ये ते पुन्हा बंद करण्यात आलं.