नवी दिल्ली : शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवर्जुन मागणी शिवसेनेने केली आहे. उत्तर प्रदेशात ज्याप्रमाणे योगींच्या सरकारने कर्जमाफ केले. त्याप्रमाणे महाराष्ट्रातील शेतकऱ्यांची कर्जमाफी करण्यात यावी, अशी मागणी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

एनडीएच्या आजच्या बैठकीत उद्धव ठाकरे यांनी मागणी केली. एनडीएच्या बैठकीत सुरूवातीलाच २०१९ च्या निवडणुकांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याच नेतृत्वात लढण्याचा ठराव मंजूर झाला. त्यानंतर या ठरावावर चंद्राबाबू नायडू, प्रकाशसिंह बादल, उद्धव ठाकरे यांची भाषणं झाली. यावेळी उद्धव यांनी शेतकरी कर्ज प्रश्नावर भाष्य केले. त्यावेळी शेतकऱ्यांना कर्जमाफीची आवर्जून उल्लेख केला.


शिवसेनेने मोदी यांच्याच नेतृत्वात लढण्याच्या ठरावाला अनुमोदन देत २०१९ ला भाजप-शिवसेना एकत्र लढणार याचेच संकेत दिले आहेत. महाराष्ट्रातून उद्धव ठाकरे, रिपाईंचे नेते खासदार रामदास आठवले, स्वाभीमानी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी, राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष व मंत्री महादेवर जानकर हे चार एनडीतले मित्र उपस्थित होते.