पणजी : शिवसेनेने भाजपच्या गडात थेट मुसंडी मारण्यासाठी जोरदार प्रयत्न केला आहे. गोवा सुरक्षा मंचसोबत युती करण्याचे संकेत शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांनी दिलेत. मात्र, वेटिंगची भूमिका घेतली आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मातृभाषा आणि संस्कृती रक्षण यासाठी शिवसेना जो लढा देत आली आहे त्याच विचारांनी गोवा सुरक्षा मंचचे संस्थापक सुभाष वेलिंगकर यांनी गोव्यात लढा दिलाय. त्यामुळे विचार आणि तत्त्वासांठी आम्ही आज एकत्र आलो आहोत. मात्र अधिकृत युती लवकर’ जाहीर करू, अशी माहिती उद्धव ठाकरे यांनी दिली.


पणजी येथे शिवसेनेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधल्यानंतर उद्धव ठाकरे आणि गोवा सुरक्षा मंचचे संस्थापक सुभाष वेलिंगकर यांच्यात भेट झाली. दोघांमध्ये चर्चा झाल्यानंतर दोघांनी पत्रकारांशी संवाद साधला. 


गोव्याच्या हितासाठी ते झटताहेत. चांगले मित्र तिथे युती ही शिवसेनेची विचारधारा आहे. तेव्हा आम्ही एक विचार असल्याने आम्ही आज एकत्र आलो आहोत. मात्र अधिकृत युतीबद्दल लवकरच जाहीर करू, असे उद्धव ठाकरे म्हणाले.


दरम्यान, वेलिंगकर यांनी भाजपव निशाणा शाधला. भारतीय भाषा सुरक्षा मंचाद्वारे मातृभाषेच्या रक्षणासाठी आम्ही लढत आलो. काँग्रेस आघाडीच्या काळात मातृभाषा आणि संस्कृतीची स्थिती खराब झाली होती. भाजपवर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला. मात्र परिस्थिती बदलली नाही. भाजपने दारुण विश्वासघात केला. आमचा संपूर्ण भ्रमनिरास झाला, अशी सुभाष वेलिंगकर यांनी भाजपवर टीका केली.