नवी दिल्ली : अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आज २०१६-२०१७ साठीचा अर्थसंकल्प मांडला. या अर्थसंकल्पात संपूर्णत: सरकारच्या देखरेखीखाली काम करणाऱ्या चार वीमा कंपन्यांना शेअर बाजारात आणण्याचा प्रस्ताव अरुण जेटली यांनी मांडलाय.  


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

लोकसभेत २०१६-१७ बजेट सादर करताना, बँकिंग क्षेत्रात महत्त्वपूर्ण सुधार आणि सार्वजनिक क्षेत्रातील साधारण विमा कंपन्यांना सूचीबद्ध करण्याचा तसंच प्रत्यक्ष परदेशी गुंतवणूक (एफडीआय) मध्ये महत्त्वपूर्म बदल करण्याचा प्रस्ताव त्यांनी मांडला.


साधारण विमा क्षेत्रात सार्वजनिक क्षेत्रातील चार कंपन्या म्हणजेच न्यू इंडिया एश्योरन्स कंपनी लिमिटेड, नॅशनल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, ओरिएन्टल इन्शुरन्स कंपनी लिमिटेड, युनायटेड इन्शुन्स कंपनी लिमिटेड काम करतात. याशिवाय विशिष्ट प्रकारचे काम करणाऱ्या दोन विमा कंपन्या - ईसीजीसी आणि एआयसी - तसंच एक जी जीवन विमा कंपनी, भारतीय जीवन विमा निगम (एलआयसी) देखील सरकारी नियंत्रणाखाली आहे. 


याशिवाय आरोग्यासाठी जेटलींनी मांडलेले महत्त्वाचे मुद्दे... 


  • पीपीपी मॉडेलनुसार नॅशनल हेल्थ स्कीम राबवणार

  • स्वास्थ विम्यामध्ये स्वस्तात उपचार मिळू शकतील

  • राष्ट्रीय डायलिसिस सेवा सुरु केली जाईल

  • प्रत्येक जिल्हा रुग्णालयात डायलिसिस सेवा सुरु केली जाईल

  • जेनेरेक औषधांसाठी नवी केंद्रे उभारणार

  • प्रधानमंत्री जनऔषधी सेवा सुरू करणार

  • डायलिसिससाठी अधिक केंद्र उभारणार