लखनऊ : उत्तर प्रदेशमध्ये रविवारी भाजपची सत्ता बनणार आहे. सरकार बनण्याआधीच भाजपचे अधिकाऱ्यांबाबत कडक भूमिका घेणं सुरु केलं आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

अधिकाऱ्यांना सोमवारपासून वेळेवर कार्यालयामध्ये पोहोचण्याचे आदेश देण्यात आले आहेत. वेळेवर कार्यालयात न येणाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे. यूपीचे चीफ सेक्रेटरी राहुल भटनागर यांनी या नियमाचं पालन करण्यास सांगितलं आहे. शुक्रवारी सगळे सेक्रेटरी, प्रिंसिपल आणि अॅडिशनल सेक्रेटरी आणि अॅडिशनल चीफ सेक्रेटरीसह सर्व विभागांना हे आदेश पाठवण्यात आले आहेत.


नवी सरकार बनत आहे. सरकारची पॉलिसी आणि घोषणापत्रामध्ये केलेल्या आश्वासन पूर्ण करायचे आहेत. मला आशा आहे की तुम्ही सगळ्या अधिकाऱ्यांनी तुमच्या इतर सहकार्यांना हे सांगावं. २० मार्चपासून सगळे सरकारी कर्मचारी वेळेवर कामावर हजर राहतील. वेळेवर पोहचा आणि आपली जबाबदारी ओळखा असं रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे.


वेळेच्या नियमांना जर दुर्लक्ष केलं गेलं तर त्यांच्यावर कारवाई केली जाईल. सरकारी अधिकारी मोदी मिशनला पूर्ण करण्याच्या तयारीत लागले आहेत. तसेच आधीच्या सरकारमधील योजना १.५ कोटी स्मार्टफोनचं वाटप, देना, समाजवादी पेंशन स्कीम, राम मनोहर लोहिया आवास योजना आणि कन्या विद्या धन योजना बंद होतील असं देखील अधिकाऱ्यांना वाटतंय.