लखनऊ : उत्तरप्रदेशच्या जनपद मैनपुरीमध्ये एका महिलेला झालेल्या अमानुष मारहाणीचा व्हिडिओ सध्या व्हायरल होतोय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

मिळालेल्या माहितीनुसार, छेडछाडीला विरोध केल्यानं काही गुंडांनी या महिलेला काठीनं मारहाण केली. या मारहाणीत महिलेच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. 


यावेळी, या महिलेचा पतीही तिच्यासोबत होता. महिलेच्या म्हणण्यानुसार, तिच्या कपड्यांवर टिप्पणी करत या गुंडांनी छेडछाड केली. याला तिनं आणि तिच्या पतीनं विरोध केल्यावर त्यांना रस्त्यावरच मारहाण करण्यात आली. 


धक्कादायक म्हणजे, हा सर्व तमाशा आपल्या डोळ्यांनी पाहणाऱ्यांनीही स्वत:ला लांब ठेवणंच पसंत केलं. कुणीही या गुंडांना रोखण्याचा प्रयत्न केला नाही.


पोलीस घटनास्थळी दाखल होईपर्यंत आरोपी फरार झाले होते. जखमी महिलेनं तीन जणांविरोधात पोलिसांत गुन्हा दाखल केलाय.