लखनऊ : उत्तरप्रदेश विधानसभा निवडणुकीत भाजपला दिमागदार यश मिळाले. या विजयामागे एक 'चाणक्य' आहे. भाजपच्या या विजयाचे श्रेय अमित शाह यांना दिले गेले त्यागे सुनील बन्सल ही व्यक्ती आहे. बन्सल चाणक्यनितीमुळेच हे घवघवीत यश भाजपला मिळालेय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

2014च्या लोकसभा निवडणुकीत विजय मिळवत नरेंद्र मोदी पंतप्रधानपदी विराजमान झाले. मोदींच्या विजयात उत्तरप्रदेशचे मोलाचे योगदान होते. 80 पैकी 72 जागांवर भाजपला विजय मिळाला होता. लोकसभेची पुनरावृत्ती विधानसभेत व्हावी यासाठी भाजपने कंबर कसली होती. त्याआधी प्रशांत किशोर यांची व्युहरचा कारणीभूत होती. 


मात्र, त्यांनी मोदींची साथ सोडली आणि काँग्रेसचा 'हात' धरला. काँग्रेसला 'अच्छे दिन' येण्याऐवजी बुरे दिन आलेत. समाजवादी पार्टीबरोबर हात मिळवणी करुन सुद्धा यश म्हणावे तसे मिळालेले नाही. त्यामुळे काँग्रेसचा चाणक्य फ्लॉप झालाचे दिसत आहे.


काँग्रेसला या निवडणुकांमध्ये मदत करणारा एक चेहरा होता तो प्रशांत किशोर यांचा. ते पॉलिटिकल स्ट्रॅटेजिस्ट आहेत. नरेंद्र मोदीच्या 2014च्या लोकसभा निवडणुकांमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामागे प्रशांत किशोर यांचा मोठा हात होता. 


सुनील बन्सल हे अमित शाह यांचा उजवा हात म्हणून ओळखले जातात. बन्सल हे उत्तरप्रदेशमध्ये सुनीलजी म्हणून परिचित आहेत. सुनील बन्सल हे मूळचे राजस्थानमधील. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेत सक्रीय असलेले 47 वर्षीय बन्सल हे अमित शाह यांच्या मर्जीतले नेते झाले. बन्सल यांची उत्तरप्रदेशमधील महासचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली.


बन्सल यांनी राज्यात भाजपच्या उणीवा हेरल्या आणि त्यादृष्टीने कामाला सुरुवात केली. 2016पर्यंत बन्सल यांनी 1.28 लाख बूथपर्यंत पक्ष कार्यकर्त्यांची फौज तयारी केली. याशिवाय भाजप हा उच्चवर्णीयांचा पक्ष असल्याची प्रतिमा होती. पण बन्सल यांनी प्रतिमा बदलताना बूथ लेव्हलवर कार्यकर्त्यांशी संवाद वाढवला. 


दलित,ओबीसी, महिला आणि तरुणांशी पक्षाचा संवाद वाढवण्यावर त्यांनी भर दिला होता. याशिवाय खासदारांनी मोदी आणि अमित शाह यांच्या सभेत हजेरी लावण्याऐवजी उमेदवारांना मैदानात उतरुन मदत करावी, अशा सूचना त्यांनी जारी केल्या. त्याचा फायदा पक्षाला या निवडणुकीत झाला.