पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी उत्तर प्रदेश निवडणुकांचं रणशिंग फुंकलंय. मोदींच्या मतदारसंघातून नितीश कुमार यांनी जेडीयूच्या प्रचाराचा श्रीगणेशा केलाय. यावेळी मोदींवर निशाणा साधला.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

यावेळी कार्यकर्ता संमेलनात बोलताना नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रीय स्वयंसेवक जोरदार टीका केलीय.. भाजप आणि संघानं कुणालाही देशभक्तीचे धडे देऊ नये अशी हल्लाबोल नितीश कुमार यांनी केलाय.


लोकसभा निवडणुकीत मोदींनी अनेक आश्वासनं दिली होती.. मात्र मोदींनी जनतेचा भ्रमनिरास केल्याचं नितीश कुमारांनी म्हटलंय.. तसंच संघाच्या तिरंगा प्रेमावरही नितीश कुमारांनी उपरोधिक टीका केलीय.