उत्तरसंडा : गुजरातमधलं उत्तरसंडा हे गाव जगभरामध्ये पापड, मठिया आणि चोलाफली या खायच्या पदार्थांसाठी प्रसिद्ध आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये या गावातील महिला याच पदार्थांमुळे 70 कोटी रुपयांचा व्यापार करत आहे. या महिलांनी बनवलेले पापड, मठिया आणि चोलाफलीला जगभरातही मोठी मागणी आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

20 हजार लोकसंख्या असलेल्या या गावामध्ये गृहउद्योगाच्या 35 पेक्षा जास्त फॅक्ट्री आहेत. 30 वर्षांपूर्वी उत्तरसंडामध्ये या व्यापाराला सुरुवात झाली. या भागातल्या फॅक्ट्री दिवाळीच्या दिवसांमध्ये तीन ते सहा टन पेक्षा जास्त मठिया आणि चोलाफली बनवतात.


दिवाळीच्या एका महिन्यामध्येच उत्तरसंडामधल्या महिला 700 टनपर्यंत खायचे पदार्थ बनवतात. यापैकी 50 टक्क्यांपेक्षा जास्त उत्पादन हे निर्यात केलं जातं, तर 15 टक्के उत्पादन हे गुजरातच्या बाहेर जातं. उत्तरसंडामध्ये बनलेली मठिया आणि चोलाफली तीन महिन्यांपर्यंत टिकू शकते.