नवी दिल्ली : जबरदस्तीनं लग्न लावून पाकिस्तानात नेण्यात आलेल्या उझमाची सुटका झालीय. इस्लामाबाद हायकोर्टानं तिची याचिका मान्य करत तिला भारतात पोहोचवण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानंतर इस्लामाबाद पोलिसांनी तिला वाघा बॉर्डरमधून भारतात परत पाठवलंय.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

उझमा मलेशियात असताना तिथे तिची भेट पाकिस्तानातल्या ताहीर अलीशी झाली. ताहीर तिच्या प्रेमात पडला आणि त्यानं तिला भेटायला पाकिस्तानात बोलावलं. उझमा तिथे पोहोचल्यावर ताहीरनं जबरदस्तीनं तिच्याशी लग्न केलं.


उझमा ही मूळची दिल्लीची आहे. तिला एक मुलगीही आहे. उझमाची मुलगी आजारी असल्याचं समजताच उजमानं पोलिसांकडे अलीविरोधात तक्रार केली. त्यानंतर भारतानंही पाठपुरावा केला आणि उझमाची सुटका झाली. सुषमा स्वराजांनीही उझमाच्या स्वागतासाठी ट्विट केलंय. वेलकम बॅक, तुला जो त्रास झाला त्याबद्दल वाईट वाटतंय, असं ट्विट सुषमांनी केलंय.