नवी दिल्ली : दुष्काळामुळे नऊ राज्यांत हाल हाल सुरु असताना, केंद्रीयमंत्री व्यंकय्या नायडू यांच्या वक्तव्यामुळे केंद्र सरकार दुष्काळाबाबत किती असंवेदीनशील आहे हे समोर आलंय. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

दुष्काळाची स्थिती काय केंद्र सरकारच्या हातात आहे का, जेव्हा देवाची कृपा होईल तेव्हा पाऊस पडेल असं वक्तव्य नायडूंनी केलंय, त्याचप्रमाणे दुष्काळग्रस्तांची जबाबदारी राज्यसरकरांवर टाकत केंद्र सरकारचं काम फक्त दुष्काळनिवारणासाठी राज्यांना मदत करणे एवढच असल्याचं त्यांनी सांगितल.


सुप्रीम कोर्टानंही दुष्काळाच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारला याआधीच फटकारलं असतानाही नायडूंच्या वक्तव्यामुळे दुष्काळाबाबत सरकारची असंवेदनशीलता पुढे आली.