नवी दिल्ली : नोटबंदीविरोधात काळापैसा बाळगणाऱ्यांमध्ये घबराट पसरली आहे. बँका आणि एटीएमच्या बाहेर मोठ्या रांगा लागल्या आहेत. विरोधी पक्ष सरकारवर टीका करत आहे. पण सरकार आपल्या निर्णयावर ठाम दिसत आहे.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल नोटबंदीच्या विरोधात आहेत. त्यासाठी ते जंतर-मंतरवर धरणे देत आहेत. केंद्र सरकारकडून वैंकेया नायडू यांनी भूमिका मांडली आहे. नायडू यांनी म्हटलं की आहे की, निर्णय परत घेणं हे मोदींच्या रक्तात नाही. नोटबंदीवर घेतला गेलेला निर्णय कोणत्याही परिस्थितीत मागे घेतला जाणार आहे.


नायडू यांनी म्हटलं की, नोटबंदीवर विरोधीपक्ष एकत्र आले आहेत. पण यांची संख्या किती आहे. आमच्या सोबत संपूर्ण देश उभा आहे. लोकांनी म्हटलं आहे की मोदीजी ना खातात आणि न ही खाऊ देतात. मी मॅगी खाण्याची गोष्ट नाही करत आहे. पंतप्रधानांचा उद्देश्य कॅशलेस अर्थव्यवस्था बनवणे आहे.