बिहारच्या काँग्रेस उपाध्यक्षांवर लैंगिक छळाचा आरोप
बिहारमधील वरिष्ठ काँग्रेस नेते ब्रजेश पांडे यांनी मंगळवारी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या विरोधात पॉस्को अॅक्टनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
पटना : बिहारमधील वरिष्ठ काँग्रेस नेते ब्रजेश पांडे यांनी मंगळवारी पक्षाच्या उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यांच्या विरोधात पॉस्को अॅक्टनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे.
हे प्रकरण राज्याचे माजी मंत्र्यांच्या मुलीशी लैंगिक शोषणाशी संबंधित आहे. पांडे यांनी त्यांचा राजीनामा प्रदेश काँग्रेस कमिटी अध्यक्ष अशोक चौधरी यांना पाठवला आहे. त्यांना या प्रकरणात फसवलं गेल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
पांडेंनी लिहिलं आहे की, 'माझं नाव मुलीने केलेल्या तक्रारीमध्ये नाही आहे. त्यानंतर माझा विरोधात षडयंत्र रचून माझं नाव यात गुंतवलं गेलं. पोलिसांनी म्हटलं की, पांडे यांचं नाव मुख्य संशयित आरोपींच्या यादीत आहे. या प्रकरणात आणखी एका आरोपीचं नाव आहे.
पीडित मुलीने तिच्या तक्रारीमध्ये आरोप केले आहेत की, प्रियदर्शीने लग्नाचं आमिष दाखवून लैंगिक शोषण केलं असं म्हटलं आहे. पोलीस प्रकरणाचा तपास करत आहेत.