शिवकाशी : तमिळनाडूतील शिवकाशी येथे फटाका फॅक्ट्रीला आग लागल्याने दुर्घटनेत ९ जणांचा मृत्यू झाला आहे. या दुर्घटनेमुळे परिसरातील 20 वाहनांचे नुकसान झाले आहे. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

परिसरातील एका रूग्णालयाचेही नुकसान झाले आहे. त्यामुळे रुग्णालयात उपचार सुरु असलेल्या रुग्णांना सुरक्षित स्थळी हलविण्यात आले आहे. या अपघातात भास्कर, सोरनाकुमारी, देवी, कामराची, पुष्पलक्ष्मी, वल्लारमती, जानकीरमन, गणेशन आणि शंनमुगराज जखमी झाले आहेत. 


दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर फटाक्‍यांच्या मोठे उत्पादन करणाऱ्या शिवकाशी येथे आग लागल्याने सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.