सेना खासदाराच्या `हवेतील उड्डाणाचा` व्हिडिओ समोर...
`एअर इंडिया`च्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले... त्यांना हे `हवेतलं उड्डाण` चांगलंच भोवणार असं दिसतंय. कारण, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आलाय.
नवी दिल्ली : 'एअर इंडिया'च्या अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर शिवसेना खासदार रविंद्र गायकवाड चांगलेच चर्चेत आले... त्यांना हे 'हवेतलं उड्डाण' चांगलंच भोवणार असं दिसतंय. कारण, या घटनेचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरून समोर आलाय.
या घटनेनंतर गायकवाड यांच्याविरुद्ध दोन एफआयआर दाखल करण्यात आल्यात. तर 'मातोश्री'वरूनही त्यांना स्पष्टीकरणासाठी बोलावणं आलंय.
एअर इंडियाच्या अधिकाऱ्यानं शिवीगाळ केली म्हणून आपण त्याला २५ वेळा चप्पलेनं हाणल्याचं काल गायकवाड यांनी कॅमेऱ्यासमोर म्हटलं होतं. त्यानंतरही त्यांनी माफी मागण्यास नकार दिलाय.
मारहाणीचा व्हिडिओ पाहा...