विजय मल्ल्याचा पासपोर्ट निलंबित
भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं विजय मल्ल्याचा पासपोर्ट निलंबित केलाय. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या सूचनेनंतर सरकारनं ही कारवाई केलीय.
नवी दिल्ली : भारत सरकारच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं विजय मल्ल्याचा पासपोर्ट निलंबित केलाय. ईडी म्हणजेच अंमलबजावणी संचालनालयाच्या सूचनेनंतर सरकारनं ही कारवाई केलीय.
विजय मल्ल्याचा पासपोर्ट चार आठवड्यांसाठी निलंबित करण्यात आलाय. तुमचा पासपोर्ट का जप्त करू नये, अशी विचारणा त्याला परराष्ट्र मंत्रालयानं केली असून याबाबत एका आठवड्यात उत्तर देण्याचे आदेश दिलेत.
बुधवारी ईडीच्या अधिका-यांनी परराष्ट्र खात्यातील अधिका-यांची भेट घेऊन मल्ल्याचा पासपोर्ट निलंबित करण्याबाबत चर्चा केली होती. राज्यसभेचा खासदार असणा-या विजय मल्ल्याकडं डिप्लोमॅटिक पासपोर्ट असून त्याची मुदत २ जूनला संपतेय. वेगवेगळ्या बँकांचं ९०० कोटी रुपये थकवल्याचा आरोप विजय मल्ल्यावर आहे. मल्ल्या सध्या लंडनमध्ये वास्तव्याला आहे.