श्रीनगर : श्रीनगरमधील पुलवामामध्ये विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चाला हिंसक वळण लागलं. विद्यार्थ्यांनी काढलेल्या मोर्चावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याचा आरोप करत मोर्चेकरी विद्यार्थ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली.


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

या दगडफेकीत एक सुरक्षारक्षक जखमी झालाय. पोलिसांनी तणावपूर्ण परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अश्रूधुराच्या नळकांड्याचा वापर केला. या घटनेविरोधात काश्मीर खो-यातील सर्व महाविद्यालयं बंद ठेवण्यात आलीत. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून हिंसाचारामुळे काश्मीर खोरं धुमसतंय.