मुंबई : जैन साधू तरुण सागर यांच्यावरील वादग्रस्त ट्विट करणारा गायक विशाल दादलानीनं राजकारणातून संन्यास घेताला आहे. आपसाठी काम करणा-या विशालच्या ट्विटरवर अरविंद केजरीवाल यांनीही नाराजी व्यक्त केली होती. हरियाणा विधानसभेत जैन साधू तरुण सागर यांचे प्रवचन झाल्यानंतर विशालने वादग्रस्त ट्विट केले होते. 


COMMERCIAL BREAK
SCROLL TO CONTINUE READING

हरियाणाच्या विधानसभेमध्ये महिलांना जगण्याची पद्धत सांगणाऱ्या नग्न साधूचं समर्थन केलं जात आहे. त्याचे जेवढे कपडे आहेत तेवढचं त्याचं शिक्षण आहे. धर्माला विधानसभेत आणण्यात आक्षेप असल्याचं ट्विट विशालनं केलं होतं. 


यानंतर विशाल दादलानीवर सोशल नेटवर्किंगवर जोरदार टीका झाली होती. अरविंद केजरीवाल यांनीही जैन साधू तरुण सागर यांच्या समर्थनार्थ ट्विट केलं होतं.