पश्चिम बंगाल, आसाममध्ये पहिल्या टप्प्यातील मतदान सुरु
पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे.
नवी दिल्ली : पश्चिम बंगाल आणि आसाम विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानाला सोमवारी सकाळपासून सुरुवात झालीये. पश्चिम बंगालमधील नक्षलग्रस्त भागातील १८ आणि आसाममधील ६५ जागांसाठी आज मतदान होत आहे.
पश्चिम मिदनापोर, पुरुलिया आणि बंकुरा या भागातील उमेदवारांसह एकूण १३३ उमेदवारांचे भवितव्य आज मतपेटीत बंद होणार आहे. पश्चिम बंगालमधील १३ भागातील मतदान सुरक्षेच्या कारणास्तव चार वाजेपर्यंत सुरु असणार आहे. तर उरलेल्या पाच विभागांतील मतदाना सायंकाळी सहा वाजेपर्यंत सुरु राहील.
आसाममध्ये ६५ जागांसाठी एकूण ५३९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. सुरक्षेच्या कारणास्तव सर्व मतदार संघावर पोलीसांचा कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. मतदानादरम्यान कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी आसाममध्ये ४० हजाराहून अधिक सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत.