सिलीगुडीमध्ये हत्तीचा धुमाकूळ, इमारतींचे नुकसान, गाडया चिरडल्या
पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पिसाळलेल्या जंगली हत्तीच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
सिलीगुडी : पश्चिम बंगालच्या सिलीगुडीमध्ये पिसाळलेल्या जंगली हत्तीच्या धुमाकूळामुळे नागरीकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
बुधवारी सकाळी सिलीगुडी येथील रहिवाशी वस्तीमध्ये पिसाळलेला हत्ती शिरला.
या पिसाळलेल्या हत्तीने धुमाकूळ घालत शंभर घरांचे नुकसान केले. सिलीगुडीच्या रस्त्यावर फिरणा-या या हत्तीने अनेक दुचाकींना आपल्या पायाखाली चिरडले, वाहनांना धडक दिली.
या हत्तीचा उच्छाद सुरु असताना नागरीक आपला जीव वाचवण्यासाठी सैरावैरा पळत होते. पश्चिम बंगालच्या तीन जिल्ह्यांमध्ये तीनशेपेक्षा जास्त गावांमध्ये जंगली हत्तींच्या कळपाची दहशत आहे.