आगरा : गढी बल्देव या गावात एका शेतात जवळपास १०० वर्ष जुनी विहीर आहे. ही विहीर २ दिवसांपासून चांगलीच चर्चेत आली आहे. मंगळवारी ही विहीर अचानक पाण्याने भरली. ही गोष्ट कळताच आजुबाजूच्या गावातूनही तेथे गर्दी जमायला सुरुवात झाली. गर्दी एवढी वाढली की पोलिसांना तेथे नियंत्रणासाठी यावं लागलं.


सध्या अनेक ठिकाणी दुष्काळ पडला आहे. अशा परिस्थितीत १०० वर्ष जुन्या या विहिरीला अचानक पाणी आल्याने विहीर चर्चेचा विषय बनली आहे. जवळपास २० वर्ष ही विहीर कोरडी होती. पण शेतात काम करणाऱ्या लोकांचं जेव्हा या विहिरीकडे लक्ष गेलं तेव्हा तो सगळ्यांसाठीच आश्चर्याचा धक्का होता.